in

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण : सर्व अधिकारी निर्दोष

२००४ साली देशभरात गाजलेल्या गुजरातमधील इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात अहमदाबादच्या सीबीआय विशेष न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. बनावट चकमकीत आरोपी करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असून त्यांना दिलासा दिला आहे.

या बनावट चकमक प्रकरणात आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी तरुण बारोट व अनाजू चौधरी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. २० मार्च रोजी पोलीस महानिरीक्षक जी.एल. सिंघल, निवृत्त पोलीस अधिकारी तरुण बारोट व चौधरी यांनी परवानगी न मिळाल्यामुळे न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्यासह ३ आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरण्याची परवागी गुजरात सरकारने नाकारली असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका न्यायालयाला दिली होती. २०१९ साली राज्य सरकारने अशाच प्रकारे परवानगी नाकारल्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने माजी प्रभारी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा आणि एन.के. अमीन यांच्याविरुद्धची कारवाई रद्द केली होती. त्यापूर्वी २०१८ साली माजी प्रभारी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे यांनाही या खटल्यातून मुक्त करण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करा’

‘हेच का तुमचं हिंदुत्व ?’ मनसेच्या अविनाश जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल