in ,

तीन वाहनांचा अपघात; ४ भाविक ठार तर ५ जण जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-खामगाव मार्गावर अकोला येथील तीन वाहनांच्या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश असून ही घटना खामगाव-चिखली रोडवरील वैरागड घाटातील मोहाडी नजीक येथील आहे. हे घटना सुमारे सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

विचित्र झालेल्या अपघातात पंढरपूरला जाणारे चार भाविक जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोला येथील भाविक एमएच ३० एए २२५५ क्रमांकाच्या प्रवासी जीपने पंढरपूरकडे जात असताना हा प्रसंग घाडला . मोहाडी नजीक एका मालवाहू वाहनाने प्रथम महावितरण कंपनीच्या प्रवासी गाडीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू जीपअकोला येथील प्रवाशांच्या वाहनावर येऊन धडकली अपघातातील जखमी आणि मृतक सर्वजण अकोला येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे . तर मालवाहू आणि महावितरणच्या वाहनातील प्रत्येकी एकजण किरकोळ जखमी झाल्याचे समजली आहे. अपघातील किरकोळ जखमी परस्पर खासगी रूग्णालयात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघातातील मृतांची नावे :
श्यामसुंदर रोकडे (५५)- चालक
विश्वनाथ कराड (७२)
शंकुतला कराड (६८)
बाळकृष्ण खर्चे (७०)

अपघातातील जखमींची नावे :
मुरलीधर रोहणकार
सुलोचना रोहणकार
उषा ठाकरे
श्यामराव ठाकरे
अलका खर्चे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ! नेहमीच लक्षात राहणार ‘लक्ष्या’

Petrol Diesel Rate Today | इंधन दरांचा भडका, सर्वसामान्यांची होरपळ