सोन्याचा किमतीमध्ये काल संध्याकाळी २९० रुपयांची वाढ झाली असून मुंबईमध्ये २२ कॅरेट ४४ हजार २०० रुपये प्रती तोळा हा दर लागू झाला आहे. तसेच २४ कॅरेट सोन्यासाठी ४५ हजार २०० रुपये प्रती तोला हा दर आकारण्यात आला आहे. आता सोन्याचा किमतींमध्ये हळूहळू परत एकदा वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमतीमध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजारांची कमी झालेली दिसून येत आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव ठरवण्यात येतो हे देशातील सर्वात मोठे कमॉडिटी मार्केट आहे. काही दिवसांपूर्वी केडिया कमोडिटीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया यांनी अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने आयात शुल्कात 2.5 टक्के कपात जाहीर केल्यामुळे त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या बाजारावर थेट दिसून येत असून येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती 42500 रुपयांपर्यंतही खाली येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला होता.
Comments
Loading…