माझ्या दोन मुलींची आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप फेटाळले.
सचिन वाझे यांनी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप परब यांनी फेटाळले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.अनिल परब म्हणाले, सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० मध्ये जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींना बोलवून त्यांची चौकशी चालू आहे. ट्रस्टींकडून 50 कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असं वाझे यांनी पत्रात म्हटले. मात्र त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवप्रमुख आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करण्यात आले आहे.
मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी नार्को टेस्टला देखील तयार आहे. चौकशीत सर्व समोर येईलच असेही परब यांनी सांगितले.
Comments
Loading…