सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एका दुर्मीळ वनस्पतीला शरद पवार यांचं नाव देण्यात आलं आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावानं ओळखली जाणार आहे. कोल्हापुरातील दोन वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी या वनस्पतीचा शोध घेतला आहे.
शिंपले हे गेली २० वर्ष गारवेल कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात नावाजले गेले आहेत. नवी वनस्पतीसुद्धा याच कुळातील असल्याचं शिंपले यांनी सांगितलं आहे. शिंपले यांनी आजवर ५ नव्या गारवेल कुळातील वनस्पतींचा शोध लावला आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी टि्वट करून दोन्ही संशोधकांचे आभार मानले आहेत. डॉ. शिंपले आणि डॉ, लावंड यांनी पवारांचा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल शरद पवारांच्या कन्या सुप्रिया यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Comments
Loading…