in

कसारा घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट

नाशिकच्या दिशेने जाणारी महामार्गावरील वाहतूक ठप्प

अनिल घोडविंदे, शहापूर
मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात शनिवारी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी लोखंडी सळई ने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. सदर ट्रक मुबईहून नाशिकच्या दिशेने जात होता. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. परंतु महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी तात्काळ टोलच्या अग्निशमन दल तसेच महिंद्रा अग्निशमन दलांनी येऊन आग विझविण्यास मदत केला. यामुळे पुढचा अनर्थ टळला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये पुन्हा मशिदीत बॉम्बस्फोट

अक्षय कुमार दिसणार ‘गोरखा’मध्ये