in ,

नायजेरियात Twitter वर अनिश्चित काळासाठी बंदी

ट्विटरने भारतातील उपराष्ट्रपतींचे ट्विटर अकाऊंट अनव्हेरिफाईड केल्याची घटना ताजी असतानाच ,नायजेरियात थेट ट्विटरवर बंदी आणण्यात आली आहे. नायजेरियाच्या राष्ट्रपतींचे एक ट्वीट डिलिट करणं ट्विटरला चांगलंच महागात पडलं आहे. नायजेरियाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी आणल्याचं जाहीर केलं आहे.


देशाच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्यासाठी ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटचा वापर केला जात आहे असं नायजेरिया सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी नायजेरियांचे राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांनी नागरी युद्धासंबंधी एक ट्वीट केलं होतं. त्यावर ट्विटरने नियमांचा संदर्भ देऊन ते ट्वीट डिलिट केलं होतं. त्यामुळेच नायजेरिया सरकार ट्विटरवर नाराज होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Fuel price hike| मुंबईकरांना इंधन दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे पेट्रोल – डिझेल दर

Shivrajyabhishek Din 2021 | भारतीय इतिहासाचं सुवर्णपान ‘शिवराज्याभिषेक’