in

‘चिमणी गिधाडांना भारी पडली’

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ नेत्यांच्या टि्वटर हॅण्डलवरील ब्लू टिक ट्विटरने काढून टाकली. ती नंतर पुर्नप्रस्थापितही करण्यात आली. मात्र, त्यावरून बरंच नाट्य रंगलं. यात केंद्राने ट्विटरला अखेरचा इशाराही दिला. या सगळ्या घटनाक्रमावर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील या संघर्षावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केलं आहे. ज्यात ट्विटरचा चिमणी असलेला लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचं दाखवण्यात आलं आहे आणि त्यातच ट्विटर हे नाव दिलेलं आहे. या फोटो बरोबरच एक ओळही आव्हाड यांनी लिहिली आहे. “चिमणी गिधाडांना भारी पडली,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींएवजी ममता दीदी, पश्चिम बंगाल सरकारचा भाजपला दणका