in

भाजपच्या दोन आमदारांचा राजीनामा

प. बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. मात्र भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी आता भाजपच्या दोन विजयी उमेदवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून भाजपची संख्या आता 75 वर पोहोचली आहे. यावरून तृणमूल काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. तसेच केंद्राने भाजपच्या आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याच्या निर्णयावर टीका करताना कर दात्यांच्या पैशाचा हा दूरुपयोग केल्याचा आरोपही केला आहे.

रानाघाट येथील भाजप खासदार जगन्नाथ सरकार म्हणाले की, बंगालमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालं नाही. जर भाजपने सरकार स्थापन केलं असतं तर आमची विशेष भूमिका असती. मात्र आता तशी स्थिती नाही, त्यामुळे पक्षानं आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही संसदेत असणं आवश्यक आहे त्यामुळेच आमदाराकीचा राजीनामा देत आहोत. जगन्नाथ सरकार हे शांतीपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.

खासदार म्हणून प्रमाणिक आणि सरकार यांना केंद्रीय सुरक्षा आधीपासूनच आहे. तर नंदीग्राम मधून निवडून आलेले सुवेंदु अधिकारी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अजित पवारांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, ठाकरे सरकार मोजणार 6 कोटी

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाउन; अशी आहे नियमावली