in

“ठाकरे सरकारला दोन वर्ष,” सरकार पडेल म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर

Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray with Yuva Sena Chief Aaditya Thackeray addresses a press conference at Shiv Sena Bhavan at Dadar in Mumbai, Friday, Nov. 8, 2019. (PTI Photo)(PTI11_8_2019_000206B)

महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकारला दोन वर्षे होत आहेत. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. मागच्या दोन वर्षांत सरकार पाडू न शकलेला विरोधी पक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद म्हणावा लागेल. मुख्यमंत्री ठाकरे आज प्रकृतीच्या कारणाने इस्पितळात आहेत, पण ठाकरी बाण्याने राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झाला. राजकारणात सदैव खोटेपणाचा जय होतोच असे नाही. विरोधी पक्षाने नक्की काय गमावले?

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दोन वर्षांनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षीय यांना काय वाटते, याचा वेध घेणारी खास पाने आजच्या अंकात आहेत; त्या विविध लेखांची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनोगतापासून..

कुठल्याही सरकारची कामगिरी केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसते. एक चांगला संघ असेल तर कर्णधाराला बळ मिळतं आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ही ताकद मला माझे सहकारी, प्रशासन, सर्वसामान्य जनता यांच्याकडून वेळोवेळी मिळाली. आम्ही महाविकास आघाडी म्हणून गेल्या दोन वर्षांच्या काळात जे काम केलं त्यामुळं राज्याची कामगिरी विविध संकटे येऊनही चांगली राहिली आणि याचं श्रेय माझे सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचं आहे. राज्यातल्या जनतेनंसुद्धा आम्हाला आपलं मानलं; ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मी समजतो.

आज तुलना केली तर, दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधनसुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. करोनाच्या या लढय़ात आपण या सुविधा मोठय़ा प्रमाणावर वाढविल्या आहेतच; शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यातदेखील विविध रोग आणि साथींचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत. प्राणवायू निर्मिती असो, मोठय़ा प्रमाणावर लसीकरण असो, मोठमोठय़ा जम्बो सेंटर्सची उभारणी किंवा यात तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नावीन्यपूर्णता आणणं असो, राज्यानं देशात निश्चितपणे उदाहरण निर्माण केलं असा मला विश्वास आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवगड तालुक्यातील फणसगाव – महाळुंगे रस्त्यावर रास्ता रोको

1 डिसेंबरपासून गॅस सिलेंडर ते होम लोनमध्ये मोठे बदल