तामिळनाडूमधील राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला असल्याचं उदयनिधी यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्याला डावलून उदयनिधी यांना तिकीट दिलं गेलं, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना उदयनिधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई. पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, सुषमा स्वराज यांची मुलगी आणि अरुण जेटली यांच्या मुलीनं टि्वट करून उदयनिधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
Comments
Loading…