कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच विविध मंत्र्यांनी संचारबंदीसाठी मानसिक तयारी करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. कडक निर्बंधांना राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करा, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
Comments
Loading…