मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. यामुळे आगामी २ दिवसांत तज्ज्ञांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान. टि्वटरवर #UddhavThackeray हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. नेटकरी आणि युझर्स मोठ्या प्रमाणात टि्वट्स करत आहेत. उद्धव यांच्यावर भन्नाट मिम्ससुद्धा पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या विविध माहितीबद्दल टि्वटस पाहायला मिळत आहेत.
‘मिम्सचा पूर’ –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही अंशाची व्हिडिओ क्लिप घेऊन त्याला चित्रपटातील क्लिप जोडली गेली आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात मिश्किलपणे यावर मिम्स बनवत आहेत.
एकानं मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओचा स्क्रीन शॉट खाली कमेंट केली आहे की, ‘माझ्याकडे केवळ ५० एमबी डेटाच शिल्लक राहिलेला आहे. लवकर मुद्यावर या’, असा मिश्किल टोलाही अनेकांनी लगावला आहे.
Comments
Loading…