in

अमरावती आढळलं अज्ञात प्रेत.. हत्या की आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील अमरावती मोर्शी रोडवर निंभी नजीक रोडच्या बाजूला अज्ञात प्रेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. निंभी येथील पोलीस पाटलांना सकाळी ७ वाजता दरम्यान रोजच्या बाजूला एक मृतावस्थेत प्रेत दिसून आलंय. तात्काळ शिरखेड पोलिसांना कळविले पोलिसांचा फोजफाटा घटनास्थळी दाखल होताच त्यांनी मृतकाची ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळख पटली नसल्याने पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शव विच्छेदन करण्यासाठी मोर्शी कडे रवाना केलं. मृतकाच्या अंगावर खुणा आढळल्याने नेमकं हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठा आरक्षण मुद्द्यावर कोल्हापूरात मराठा नेते आक्रमक

”चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरला कोरोना विषाणू”, अमेरिकेचा दावा