in ,

Yogi Adityanath | “अमेरिका आणि युरोपपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यूदर कमी”

अमेरिका आणि युरोपपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यूदर कमी असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. करोनासंदर्भातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये राज्य सरकारला यश आल्याचे सांगताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची तुलना थेट अमेरिका आणि युरोपशी केली आहे.

राज्यातील करोना परिस्थिती हाताळताना राज्य सरकार २०२० पासूनच चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे योगींनी लखनऊमधील एका कार्यक्रमात म्हटले. राज्यातील दर १० लाख लोकसंख्येमागे कोरोना मृतांचा आकडा ४७ इतका असल्याचे योगींनी सांगितले. इतकच नाही राज्य सरकारची कामगिरी किती चांगली आहे हे सांगताना या मृत्यूदराची तुलना योगींनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रासोबत केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाढदिवसाच्या दिवशी का ट्रोल होतेय सोनाक्षी सिन्हा?

Maharashtra Corona;दिलासा! महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा उतरताच…