in

केंद्र सरकारकडून लसीकरणाचं नियोजन होत नाही – राजेश टोपे

केंद्र सरकारशी आमचा राग लोभ नाही आहे. मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचं नियोजन होत नसल्याची खंत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तर काही जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. पश्चिम महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहे. कोल्हापूर, सांगली,सातारा मराठवाड्यातील बीड येथे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी लसीच्या उपलब्धतेवर जोर दिला. लसीकरणाबाबत योग्य व्यवस्थापन होत नाहीये. कारण आज आम्हाला वीस ते बावीस लाख लोकांना लसीचा दुसरा डोस हवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जेवढ्या लसी लागत आहेत, त्या देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. ती आमची अपेक्षा आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मी सांगितले.

वीस लाख लसी द्याव्या

आम्हाला त्वरीत लसीच्या लसीचे वीस लाख डोस द्यावेत अशी मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्राने सहा लाख लसी पाठवल्या. राज्याने खरेदी केलेले तीन लाख डोस असे एकूण जवळपास नऊ लाख डोस आम्ही 44 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना देत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारने वीस लाख लसी त्वरीत देणे गरजेचे आहे.

राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की लसी आयात करण्यासाठी एक ग्लोबल पॉलिसी असावी. यामध्ये मीसुद्धा होतो. असे नसेल तर सगळ्या राज्यांमध्येच स्पर्धा सुरु होईल. त्याचा फायदा देशाबाहेरच्या कंपन्यांना होईल. ही अनहेल्दी पॉलीसी नको, अशी मागणी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संचारबंदीच्या काळात उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

महाराष्ट्रात 1500 म्युकर मायकोसिसचे रुग्ण; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती