मुंबई आणि महानगर परिसरासह राज्यभर अनेक ठिकाणी करोना लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे गुरुवारीच लसीकरण ठप्प झाले आहे. ज्यांनी पहिली मात्रा घेतली त्यांनी दुसरी घेण्यासाठी लसच उपलब्ध नाही. काही भागांत एक दिवस आणि जेमतेम तीन-चार दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. मुंबई शहरातील ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवरील लससाठा संपल्याने तेथे गुरुवारी लसीकरण स्थगित करावे लागले. तसेच अनेक केंद्रांवर लसीकरण सुरू असून तेथेही एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिका क्षेत्रातील सर्व केंद्रांवर दररोज सरासरी ४० ते ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. सध्या एक दिवसाचा साठा असल्याने शुक्रवारी लसीकरण होऊ शकेल. पंरतु, लसींचा पुरवठा न झाल्यास शनिवारी लसीकरण मोहीम ठप्प होईल. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण केले जाते आहे. अनेकदा दोन लाखांपर्यंतच लस मात्रांचा साठा उपलब्ध असतो. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच लस तुटवड्याबाबत भीती व्यक्त केली होती.
मुंबईतील सायन रुग्णालयासह २७ लसीकरण केंद्रे गुरुवारी बंद ठेवण्यात आली होती. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर गुरुवारी १ लाख ३० हजार लोकांचे लसीकरण झाले. आता केवळ ४०० लोकांना पुरेल इतकाच साठा बीकेसी केंद्रावर आहे. मुंबईतील सायन रुग्णालयासह २७ लसीकरण केंद्रे गुरुवारी बंद ठेवण्यात आली होती. धारावी येथील १५ दिवसांत अंदाजे चार हजार लोकांचे लसीकरण झाले. तर गुरुवारीच येथील साठा समाप्त झाला. अंधेरीतही एकाच दिवस पुरेल इतका साठा शिलक आहे. कुपर रुग्णालयात आजवर ४३ हजार लोकांचे लसीकरण झाले. तसेच जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सीन पहिली मात्रा देणे थांबवण्यात आले आहे. केवळ दुसरी मात्रा देण्यात येत आहे. जम्बो लसीकरण केंद्रावर दिवसाला दोन ते अडीच हजार लोकांचे लसीकरण केले जाते. तेथेही दोन दिवसांचाच साठा आहे.
Comments
Loading…