in ,

”मुंबईत ३ दिवस लसीकरण बंद राहणार”

मुंबईत लसीच्या डोसचा अपुरा साठा असल्यामुळे पुढचे ३ दिवस लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

सुरेश काकाणी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले कि, आजचा आमचा साठा संपत असून पुढचे ३ दिवस लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे ते म्हणाले.

मुंबईसाठी 76 हजार डोस मिळाले आहेत. त्यापैकी 50 हजार आज दुपारपर्यंत संपले. उरलेले दिवसभरात संपतील. त्यामुळे पुढील साठा मिळेपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. केंद्राकडून साठा उपलब्ध करून दिला, तरच लसीकरण करता येईल”, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MI vs RR : मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं लक्ष्य

Pune Lockdown Extended | पुण्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन कायम