in

कोरोना विषाणू प्रसार रोखण्यास लस प्रभावी; तज्ज्ञांचा दावा

विषाणूंचे उत्परिवर्तन ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून साथरोगांच्या व्यवस्थापनासाठी विषाणूंच्या जनुकीय क्रमवारी चाचण्या सातत्याने होणे आवश्यक आहे. कोणत्या जनुकीय क्रमवारीतील विषाणूचा रुग्णाला संसर्ग झाला आहे त्याने रुग्णाच्या प्रकृतीत फरक पडत नाही, मात्र व्यापक प्रसार रोखण्यासाठी जनुकीय क्रमवारी महत्त्वाची आहे.

सध्या उत्परिवर्तन झालेल्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपलब्ध लशी प्रभावी ठरतील, असे मत देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केले.

तज्ज्ञांची समिती –

भारतीय औद्योगिक, वैज्ञानिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे, केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरुप, राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्थेच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, डॉ. अनुराग अगरवाल, डॉ. सुधांशु व्रती, डॉ. एस. दास, डॉ. शाहिद जमिल आणि इतर तज्ज्ञ सहभागी झाले होते.
देशात सध्या दहा राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशाळा विषाणूंच्या उत्परिवर्तनासह जनुकीय क्रमवारी निश्चित करण्याचे काम करत आहेत. किमान पाच टक्के नमुन्यांची जनुकीय क्रमवारी चाचणी व्हावी, असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. तेवढ्या प्रमाणात नाही, तरी मोठ्या प्रमाणात नमुन्यांची जनुकीय क्रमवारी तपासणी करण्यात येत आहे. लवकरच आणखी पाच प्रयोगशाळा यामध्ये समाविष्ट होणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

विषाणूच्या उत्परिवर्तनाचा विचार करता त्याचे स्थळ-काळानुसार संदर्भ बदलतात. त्यामुळे दोन वेळा उत्परिवर्तन, तीन वेळा उत्परिवर्तन या तपशीलांकडे संदर्भानुरूप पाहण्यात यावे. सध्या उत्परिवर्तनानंतर विषाणूची जी रूपे समोर येत आहेत, त्यावर उपलब्ध असलेल्या लशी प्रभावी ठरतील असे दिसत आहे,’ असे डॉ. दास यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशकात दाखल

CBI कडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल