in ,

मुंबईतील जाहिरात कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड; राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची जाहिरातीत टिंगल

अंधेरीमधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात तुफान राडा झाला. स्टोरिया फुड्स नावाच्या जाहिरात कंपनीच्या कार्यालयात काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची या जाहिरातीत टिंगल करण्यात आली होती. हा प्रकार त्या पक्षातील कार्यकर्त्यांना न रूचल्याने त्यांनी थेट जाहिरात कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुंबई पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले. लॉकडाउनचे निर्बंध असल्याने कार्यालयात जास्त कर्मचारी नव्हते, मात्र पोलिस वेळेत हजर झाल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं.

देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्या नेत्याचे हावभाव आणि त्याची बोलण्याची लकब सारखीच ठेवत त्याची टिंगल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अशा प्रकारे आपल्या नेत्याची खिल्ली उडवली जाणं त्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना पटलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात जाऊन तोडफोड केली.

मुंबई पोलिसांच्या जवळच्या पोलिस ठाण्यात जेव्हा याबद्दलची माहिती देण्यात आली तेव्हा पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. सध्या मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या खाजगी जाहिरात कंपनीमध्ये फार कमी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सुदैवाने या कार्यकर्त्यांनी त्यां कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा केली नाही. केवळ ऑफिसची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी येत तोडफोड करणाऱ्यांना लगेच ताब्यात घेतलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी सामना

Corona Pandemic | लष्कराचा वापर करणार आहात का?, सुप्रीम कोर्टाची केंद्राला प्रश्न