in

वसई विरार रुग्णालय भीषण आग; पाहा कोण, काय म्हणाले?

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात आग लागली आणि यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला. अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली असल्याची माहिती आहे. याच आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी टि्वट करत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ‘विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले’, असं टि्वट मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे.

पीएमओ इंडियाकडूनही टि्वट करण्यात आलं आहे. विरारमधील रुग्णालय आगीची दुर्घटना दु;खद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदन व्यक्त करतो, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ टि्वट केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट करत संवेदना व्यक्त केली आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असंही शाह यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विरारच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

विरार दुर्घटना | पंतप्रधान आणी मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना लाखांची मदत