राज्यभरात मिनी लॉकडाउन जारी करण्यात आल्यानंतर याविरोधात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्यभरात आज विविध ठिकाणी व्यापाऱ्यांनी या संचारबंदीला विरोध दर्शवला. मुंबईत व्यापाऱ्यांनी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना आडवल्याचे दिसले. यावेळी काही प्रमाणात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
याच प्रमाणे ठाणे आणि रत्नागिरीतही व्यापारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. व्यापारी संघटना एकवटल्याने काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. तर, अनेक भागांमध्ये पोलिसांनी स्वत: हटकल्यानंतर दुकानं बंद करण्यात आली.
Comments
Loading…