in

राज्यातील लॉकडाउनवरुन विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण…

राज्यात लॉकडाउनवरुन सुरु असलेल्या गोंधळावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं असून आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती दिली आहे.

राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं.

लॉकडाउनवरुन गोंधळ

“अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही करत असतो”.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हॉट्सॲपकडून युझर्सवर दबाव; प्रायव्हसी पॉलिसीच्या मुद्द्यावरून केंद्राचा आरोप

व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक