राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. नागपूरमध्येही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, लॉकडाउन लावणार नाही मात्र निर्बंध कडक केले जातील, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. मात्र, यातील जवळपास 80 टक्के लोकांना कुठलीही लक्षणं (सिमटम्प्स) नाहीत हे दिलासादायक आहे. नागपूर जिल्ह्यासाठी आमच्या विभागानं 65 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
दरम्यान, लोकल बंद होणार नाही. तसंच कोरोनाच्या बाबतीत आमचा अंदाज चुकलाच, अशी प्रांजळ कबुलीही वडेट्टीवार यांनी दिली. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे. त्यामुळे रक्तदान कराच, असं आवाहनही वडेट्टीवार यांनी यावेळी केलं.
Comments
Loading…