in

विरार रूग्णालय आग प्रकरण; व्यवस्थापक, डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल

विरारच्या विजयवल्लभ रुग्णालय आग दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेची दखल केंद्रातील मंत्र्यांनी घेतली. त्यामुळे या घटनेच्या चौकशीला वेग आला असून आता घटनेप्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला.

विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल 15 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला होता. या प्राथमिक तपासात दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे समोर आल्याने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०४, ३३७ आणि ३३८ अन्वेय निष्काळजीपणा आणि इतर व्यक्तींच्या जिवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला.

तसेच रुग्णालयाचे नव्याने अग्निसुरक्षा लेखापरिक्षण, विद्युत सुरक्षा लेखापरिक्षण केले जाणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यानंतर जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

मृतांची नावे

उमा सुरेश कंगुटकर ( ६३), निलेश भोईर, (३५), पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव (६८), रजनी कडू, ( ६०), नरेंद्र शंकर शिंदे (५८), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (६३), कुमार किशोर दोशी (४५), रमेश उपयान (५५), प्रवीण शिवलाल गौडा (६५), अमेय राजेश राऊत (२३), शमा अरुण म्हात्रे (४८), सुवर्णा पितळे ( ६४), सुप्रिया देशमुख (४३), शिवाजी पांडुरंग विलकर (५६), नीरव संपत (२१) तर नीरव संपत (२१) या रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना संध्याकाळी उशीरा मृत्यू झाला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

PBKS vs MI: पंजाबचा मुंबईवर विजय