in

विरार रुग्णालय आग; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करा

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचसंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत सोमय्या यांनी सध्याची परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेऊन केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.

तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केलीय. “आणखीन एक धक्कादायक घटना. विरारमधील कोव्हिड रुग्णालयामधील आयसीयूला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समल्याने खूप दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी असून यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लवकरच ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात होणार दाखल

विरारच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?