in

विश्वनाथन आनंद यांचा मदतीचा हात

जगद्विख्यात बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद हेही कोरोना मदतीसाठी फंड उभारणार आहेत. पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेल्या विश्वनाथन यांनी भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाईन बुद्धीबळ खेळणार आहेत.

दुसऱ्या जगविख्यात स्पर्धकांसमवेत ते सामना खेळणार आहेत. चेज डॉट कॉम ब्लिट्जधारक किंवा 2 हजारांपेक्षा कमी फिडे रेटींगवाले खेळाडू 150 डॉलर दान देऊन आनंद यांच्यासमवेत सामना खेळू शकणार आहेत, तर इतर ग्रॅँडमास्टर्ससोबत खेळण्यासाठी 25 डॉलर द्यावे लागणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता हे सामने चेस डॉट कॉमवर प्रसारीत केले जातील, असे वेबसाईटने सांगितले.

सध्या देशात कोरोना महामारीचं संकट असून प्रत्येकाला या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. असा कुणीही नाही, ज्याला या संकटाने नुकसान झाले नाही. त्यामुळे, आपण सर्वांनी कोरोना मदतनिधी दिला पाहिजे, भारतातील सर्वात श्रेष्ठ ग्रँडमास्टर्ससोबत आपण चेस खेळून देशासाठी योगदान देऊ शकता, असे विश्वनाथन आनंद यांनी म्हटले आहे. बुद्धीबळ महासंघातर्फे हा छोटासा प्रयत्न आहे, आपण सर्वांनी उत्फुर्तपणे यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आनंद यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका

पाच राज्यातील पराभवाची काँग्रेस करणार समीक्षा