in

Waman Bhonsle; ‘अग्निपथ’ फिल्मचे एडिटर वामन भोसले

बॉलिवूड राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. आज २६ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत माळवळी. या घटनेनंतर बॉलीवूड विश्वात शोक व्यक्त होत आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘मौसम’, ‘हिरो’, ‘कर्झ’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘अग्निपथ’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी वामन भोसले यांनी काम केले आहे.वामन भोसले यांनी १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९७७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इनकार’ या चित्रपटासाठी वामन यांना सर्वोत्कृष्ट एडिटरचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. तसेच दिग्दर्शक सुभाष घई यांनी देखील ट्वीट करत दुख व्यक्त केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

KKR vs PBKS : कोलकत्ताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मध्य रेल्वेने केल्या 10 प्रवाशी गाड्या रद्द