in

वाशिममध्ये 35 खेडयाचा विद्युत पुरवठा खंडित;ग्रामस्थांनी महामार्गावर केला चक्काजाम

वाशिम जिल्ह्यात 35 खेडयाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तब्बल 30 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून औरंगाबाद- नागपूर महामार्गावर बसून चक्काजाम केला आहे.

वाशिममध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरातील 35 खेडयाचा विद्युत पुरवठा 30 तासापासून खंडित आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी औरंगाबाद- नागपूर महामार्गावर रस्त्यावर बसून चक्काजाम केला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होणार नाही तो पर्यंत ग्रामस्थ उठणार नाही अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. परंतु मंगरुळपिर ठाणेदार यांनी मध्यस्ती ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघरवासियांना दिलासा; जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार

HSC Exams : यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास!