in ,

दसऱ्यानंतर नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

प्रशांत जव्हेरी; नंदुरबार | नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणात अवघे 50 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी नंदुरबार नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात अनियमित पावसामुळे आणि विरचक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या वतीने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच नंदुरबारवासियांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या बाष्पीभवनामुळे साठा अजूनही कमी होऊ शकतो त्यामुळे त्यावेळीही योग्य तो पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर हल्ला

‘माझा अजित जितका तापट तितकाच प्रेमळ ही’!,आईने केलं अजित दादांच तोंडभरून कौतुक