in

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित

मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणांचा सध्या एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक केलेली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. एनआयएने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित होते, असा दावा एनआयएने केला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयात माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट एका बैठकीत रचण्यात आला. त्या बैठकीला सचिन वाझेही उपस्थित होते. त्याचबरोबर विनायक शिंदेही त्या बैठकीत सहभागी झालेला होता. हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीशी संपर्क करण्यासाठी सचिन वाझेंनी मोबाईलचा वापरही केला होता. यावेळी एनआयएने कट रचणाऱ्या आरोपीचं नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, तपास यंत्रणा हत्येमागील कटाचा आणि त्याच्या उद्देशाच्या खूप जवळ पोहचली असल्याचं एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता? या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचं एनआयएने न्यायालयात सांगितलं. यावेळी आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं शिंदेचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयात सांगितलं. सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवलं गेलेलं नाही, असं जैन म्हणाले. न्यायालयाने सुनावणी अंती दोघांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Petrol Rate Price | इंधन झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर