in

Weather alert | येत्या दोन-तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात पाऊस बरसणार!

आगामी दोन ते तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार मुंबईत थोड्याचवेळात पावसाला सुरुवात होईल. मुंबईत रविवारी मध्यरात्रीनंतर चांगला पाऊस पडला होता. मात्र, सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे.

मान्सूनचा पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुण्यातही रविवारी मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona update | कोरोना रूग्णांच्या संख्येत घट

Heavy Traffic | अनलॅाक होताच मुंबईकर घराबाहेर…