in

Maharashtra Rain | राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी रविवारपासून पुढील पाच दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा या मार्गाने गेला आहे. परिणामी सध्या तेलंगणासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आदी राज्यांत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातही रविवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती आहे. मात्र, काही भागांत संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ होत आहे. आज इगतपुरीत पावसाला सुरुवात झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs RCB: चेन्नईचा ‘विराट’ विजय

Rajan Mishra Death : शास्त्रीय गायक राजन मिश्र यांचे दिल्लीत निधन