in

Weather Updates | मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता ‘यास’ चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात मंगळवारी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण असून पुण्यात बुधवारीहीदेखील मुसळधार पाऊस असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. खरंतर, तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण, रायगड, सिंधुदूर्ग, मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘१० कोटी द्या अन्यथा शासकीय कार्यलयं बॉम्बने उडवून टाकू’

भारत बायोटेकची बूस्टर डोसची चाचणी सुरू