in

कोल्हापूर, नाशिक, जालन्यात मुसळधार पाऊस

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असल्याचं पहायला मिळत आहे. वातावरणात बदल झाल्याने राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज कोल्हापूर, नाशिक , मालेगाव , जालना येथे गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी येथे मुसळधार पाऊस झाला आहे. तर मलकापूर शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे अंबा, फणस, काजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर कोल्हापूर शहरात पाऊस पडला नसल्याने उकाडा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गारपिटीचा जोरदार पाऊस झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”राज्यातील जनतेला किती लसी मोफत देणार?”

केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही; पंकजा मुंडेंनी सरकारला सुनावलं