in

आता इस्त्राईलचे नवे पंतप्रधान कोण?

इस्राईलमध्ये मार्च 2021 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या निकालामध्ये इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्राईलवरील सत्ता संपुष्टात आलीय. सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत त्यांना सत्तेवरुन खाली खेचलंय. या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी अल्पमताचं सरकार स्थापन केलं. पण अनेक अनेक प्रयत्न करुनही बहुमत सिद्ध करु शकले नाही.

आता इस्राईलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट होतील अशी दाट शक्यता आहे. इस्राईलच्या 8 विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापनेवर एकमत बनवलं आहे. त्यांच्याकडून नेफ्टाली बेनेट यांना पंतप्रधान पदासाठी पुढे केलं जाणार आहे

विरोधी पक्षांनी इस्राईलमध्ये सत्तास्थापनेची घोषणा करतानाच आपल्या सत्तेच्या पंतप्रधान पदाचा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केलाय. यानुसार सुरुवातील यामिन पक्षाचे प्रमुख नेफ्टाली बेनेट इस्राईलचे पंतप्रधान असणार आहेत. त्यानंतर दोन वर्षे येश एटिड पक्षाचे नेता येर लेपिड स्वतः पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारतील. अशी माहिती समोर येत आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Unlock; राज्य अनलॉक करण्याच्या निर्णयात कुठलीही गफलत नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण!

The Family Man 2 | काही वेळात ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होणार!