in ,

परमबीर सिंह यांच्यावर पत्र देण्यासाठी कुणाचा दबाव? : हसन मुश्रीफ

काही दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर सीबीआयनं छापेमारीही केली होती. यासर्व घडामोडींवर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यासाठी नेमका कुणाचा दबाव होता? तसेच एका आरोपीच्या पत्रावरुन पुढची दिशा ठरू शकत नाही, असं अनिल देशमुख प्रकरणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

“अनिल देशमुखांना अटक होणार नाही. कारण पुरावेच नाही. एखाद्या आरोपीचं पत्र हे काय पुरावा होऊ शकत नाही. पत्र कसं दिलेलं आहे? पत्र देण्यामागे उद्देश काय? त्यामागे दबाव कुणाचा? तसेच यामागील कटकारस्थान काय, हे सांगतोय आम्ही.” पुढे बोलताना, सामनामधल्या मारुती कांबळेचं झालं काय?, हे सांगा आम्हाला, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Oxygen Express | दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लसीकरणाबाबत मोठी घोषणा