in

1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? आज ठाकरे सरकारची महत्त्वाची बैठक

कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. मुंबईतील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील स्थितीदेखील दिलासादायक आहे. त्यामुळं या भागातील निर्बंध १ जूनपासून काहीप्रमाणात शिथील केले जातील. निर्बंध एकहाती मागे घेण्यात येणार नसून टप्याटप्यानं मागे घेतले जातील, असं सूचक विधान राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यानुसार राज्य सरकारही महाराष्ट्र अनलॉक करण्यास अनुकुल असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं समोर येत आहे. यामुळे १ जूननंतर लॉकडाऊन उठणार की पुन्हा वाढणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल अद्याप सरकारने कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. तर काही मंत्र्यांनी लॉकडाऊन उघडणार असल्याचा सुतोवाच केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठणार की लांबणार यावर आज महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेतीन वाजता राज्यमंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘तुमचा बाप आणि भाऊ तर’…महुआ मोईत्रा रामदेव बाबांवर भडकल्या

वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची प्रतीक्षा संपली