in

निष्काळजीपणा! …अन् उंदीर अन् मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह

उत्तर प्रदेशच्या आजमगडमधील जिल्हात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह सडल्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरला होता. त्यामुळेच नंतर ही घटना उघडकीस आली. चार दिवस हा मृतदेह शवविच्छेदनगृहात पडून होता. मृतदेहाला मुंग्या आणि उंदीर खात राहिले. मात्र, तरीही या गोष्टीची कोणालाच कल्पना कशी नव्हती असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

29 एप्रिलला संध्याकाळी बिलरियागंजमध्ये रस्त्यावर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. 32 वर्षीय अज्ञात महिलेला रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी पाच वाजता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी 30 एप्रिलला सकाळी महिलेचा मृत्यू झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला. सोबतच पोलिसांनाही शवविच्छेदन प्रक्रियेसाठी याबाबतची माहिती दिली. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मृतदेह हा तसाच पडून राहिल्याने उंदरांनी तो खाल्ला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुखद बातमी : केरळमध्ये मान्सून १ जूनला धडकणार

देशात पुन्हा लॉकडाउन लागणार?