in

महिला गिर्यारोहकांकडून गंगोत्री-1 शिखर सर

पुणे | गंगोत्री-1 या अत्यंत कठीण शिखरावर गिरिप्रेमीच्या पूर्वा शिंदे (सिंह) आणि स्नेहा तळवटकर या दोघींनी यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला.गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात गंगोत्री शिखर समूह असून यात गंगोत्री 1, गंगोत्री 2 आणि गंगोत्री 3 या शिखरांचा समावेश होतो. त्यापैकी गंगोत्री 1 हे सर्वात उंच असून, चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमध्ये गणले जाते.

या मोहिमेमध्ये पूर्वा शिंदे (सिंह) हिच्या नेतृत्वाखाली स्नेहा तळवटकर, रितू चावला, डॉ. सुनीता कोळके, हेमांग तन्ना यांनी सहभाग घेतला होता.या गिर्यारोहकांना शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित गिरिप्रेमींचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन मिळाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू

बीड नगर पालिकेत तिघींनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले; आत्मदहनाचा प्रयत्न