in

World Milk Day | जागतिक दूध दिनानिमित्त दुधाचं महत्त्व आणि फायदे

1 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा उद्देश आहे.

जागतिक दूध दिन हा दुग्धशाळेच्या क्षेत्रातील समस्या व समस्यांकडे लक्ष देण्याची आणि दूध माणसाच्या आहारासाठी किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याची एक उत्तम संधी आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी, लोक जागतिक दूध दिवस 2021 फोटो आणि एचडी वॉलपेपर फेसबुक, ट्विटर, LinkedIn आणि पिंटरेस्ट वर देखील शेअर करू शकतात. जागतिक दूध दिन विविध देशांमध्ये विविध मार्गाने साजरा केला जातो. तथापि, COVID-19 चे निर्बंध लागू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक दूध दिन साजरा करणे शक्य होणार नाही.

जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगात दूध दिवस साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये 1 जून रोजीच दुग्ध दिवस साजरा केला जात असे. त्यामुळे 2001 सालापासून 1 जून या तारखेलाच दूध दिन साजरा करण्यात येऊ लागला.

दुधाचं महत्त्व आणि फायदे
दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते. दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषणतत्त्वांचा अतिशय चांगला स्त्रोत आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, ऑयोडिन, आयरन, पोटॅशियम, फोलेट्स, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड, रायबोफ्लेविन, जीवनसत्व ब12, प्रोटीन, उत्तम फॅट इत्यादीचा समावेश असतो. दूध प्यायल्यामुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते, कारण यात उच्च प्रतीच्या प्रथिनांसह अमिनो अॅसिड आणि फॅटी अॅसिडचा समावेश असतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lockdown | जाणून घ्या मुंबई महानगरक्षेत्रात आजपासून काय सुरू अन् काय बंद

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही – संजय राऊत