in , ,

महाराष्ट्राला पुन्हा एकदा ‘यलो अलर्ट’ जारी

उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पाऊसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, ठाण्यासह कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. आज सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक के.एस. होसळीकर यांनी ट्वीट करून राज्यातील पावसाबद्दलची माहिती दिली आहे. 13 ते 16 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Parab | समितीचा विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर….

महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे, हे राज्यसरकारच्या मालकीची नाही; संजय राहुत