in

भरदिवसा तरुणाचा भोसकून खुन, खुनाची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील बसस्थानक परीसरात महाविद्यालयीन तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना घडलीय ही घटना आज दुपारी १ वाजता झाली आहे. या खुनाचा संपूर्ण घटनाक्रम CCTV कॅमऱ्यात कैद झाला आहे.

खुन झालेल्या युवकाचे नाव यश उत्तम मिराशे (वय १७ वर्ष) असून या घटनेमुळे हिमायतनगर येथे दहशतीचे वातावरण पसरलेय. या गुन्ह्यातील मारेकरी व मयत हे सर्वजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे ग्रामिण भागातुन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या पालकांतुन चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जख्मींची विचारपूस केली व मयताच्या नातेवाइकांना धीर दिलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Malad

थरार… अरे बापरे मुलीच्या गळ्यात साप