in

“आपली वास्तु आणि आपले आरोग्य”; सध्याच्या वाढत असलेल्या कोरोना महामारीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त टिप्स

शुभंकरोति कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा |
शत्रुबुद्धि विनाशाय, दीपोज्योती नमोस्तुते ||

आपल्या लहानपणीच “शुभंकरोति” म्हणायचे संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवल, म्हणजे बालपणातच देवाकडे चांगले आरोग्य मिळावे म्हणून तिन्हीसांजेला दिव्याजवळ केलेली प्रार्थना. दीपावलीलासुद्धा नरक चतुर्दशीला आपण यमदेवतेकडे दीर्घायुष्य मिळाव म्हणून प्रार्थना करतो आणि अचानक मृत्युपासून सुटका मागतो. परंतु आपल्याला याची कल्पना आहे, की जिथे आपण वास करतो त्या वास्तुकड़ेच चांगले आरोग्यसंपदा देण्याची शक्ति आहे. सुदृढ़ आणि निरोगी आरोग्यासाठी आपल मन आणि तन असे दोन्ही सशक्त असण गरजेच असते म्हणून सध्याच्या महामारीमध्ये घरच्याघरीच आपण काहि बदल किंवा कुठले उपाय करू शकतो ते पाहु.

घराच बह्मस्थान किंवा नाभीस्थान, सेंटर ज्याठिकाणी आहे, तिथे मोकळीक, स्वच्छता किंवा जड़त्व नसाव. पूर्ण घराला लागणारी सकारात्मक ऊर्जा इथूनच घराच्या सर्व देवतांना मिळते. येथे गाईच्या तुपाचा दिवा तिन्ही सांजेला लावावा.

आपल्या वास्तुच्या परिघिय क्षेत्रातील उत्तर आणि ईशान्य (NNE) याप्रभागाच्या मध्यावर चरक देवता असते, समुद्रमन्थनातून उत्पत्ति झालेली ही देवता रोगप्रतिकारशक्ति प्रदान करते. जलतत्व असलेल्या याप्रभागात कुठलीही डिस्पोजल ऐक्टिविटी नसावी. टॉयलेट नसाव. कुठलेही जड़त्व नसाव. अश्विनीकुमार किंवा धन्वंतरि देवतेचे चित्र किंवा मूर्ती इथे स्थापन करावी. धन्वंतरि मंत्राचा जप करावा. यप्राभागात स्वयंपाकघर किंवा गॅस-बर्नर नसावा. रंगसंगती न्यूट्रल असावी भड़क रंग नसावेत, दैनदिन लागणारी औषध इथे ठेवावीत. ती औषध चांगली लागु पडतात. ईशान्य दिशा म्हणजे आपल्या वास्तुपुरुषाच डोक, शिर तसेच ध्यानधारणेची जागा, हा प्रभाग जर बिघडला असेल तर आजारपणात भीति वाटण, योग्य निर्णयक्षमतेचा अभाव, विचारांची अस्पष्टता जाणवते आणि त्यामुळे चुकीच मार्गदर्शन घडत.

घराची पूर्व दिशा जर बिघडलेली असेल तर तुम्हाला आळस, निरुत्साही बनवते. त्यामुळे आरोग्याला लागणारी सचेतना बिघडते. सकाळच्या सूर्योदयापूर्वी दिड तास आधी मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग किंवा नियमित व्यायाम करुन ब्रह्मस्थानाकडून पूर्व दिशेला असलेली पहिली देवता म्हणजे आर्यमा आपण सक्रीय करू शकतो. निश्चितच तुम्हाला याची सकारात्मकता येईल.

आग्नेय दिशेला कुठलेही जलतत्व, पाण्याचा साठा नाहीना याची खात्री करा. हे घरात रोगाला आमंत्रण देऊ शकते.
घराची दक्षिण आणि आग्नेय यामधला प्रभाग (SSE) आत्मविश्वास, मनःसामर्थ्य, एकाग्रता देणारा असतो. मारुतीची उपासना करुन शरीरबळ मिळवून देऊन सकारात्मक लहरि इथून मिळवू शकतो.

आपल्या वास्तुच्या वायव्य प्रभाग आपल्याला समर्थन किंवा सपोर्ट देणारा असतो. हा प्रभाग कायम सकारात्मक लहरींचा असावा कारण आजारपणात सर्वात महत्वाची गोष्ट आपणास लागते ती म्हणजे आपल्या माणसांची नैतिक आणि आर्थिक मदत. स्वतःकडे पैसे असूनही अचानकपणे खटपट करणारा आपला मित्रपरिवार, शेजारि आणि जवळचे नातेवाईक यांना एकत्र बांधून ठेवणारी हि दिशा कायम सकारत्मक असावी.

वास्तुमध्ये सकारात्मक वातावरण निरंतन ठेवण्यासाठी आपल्या घराच प्रवेशद्वार आणि घराची फरशी कायम गोमूत्र आणि खड़ेमिठाच्या पाण्यान पुसून घ्यावी.

दुर्गाकवच – कवच अर्गला कीलक, रामरक्षा स्तोत्र पठण करावा, जमेल तेव्हा भीमसेनी कापुर लावावा.
संध्याकाळी बाम्बू पासून तयार केलेली उदबत्ती लावण टाळाव. त्यापेक्षा गुगुल, लोबान धुप लावावा.
सकाळि आणि संध्याकाळी जमल्यास अतिशय सोपे असे अग्निहोत्र करावे.

ज्योतिष किंवा वास्तु आपल प्रारब्ध, भोग किंवा नशीब नक्किच बदलु शकत नाहि परन्तु आपली जीवनशैली, दृषिकोन नक्कीच सकारात्मक करू शकत. आपण पाहतो की ECG मधील सरळ रेषासुद्धा आपल्याला खल्लास करुन टाकते, परतुं अप्स-डाउन दाखवणाऱ्या रेषाच आपल जीवंतपण दर्शवते, सध्याची करोनाची महामारीसुद्धा वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात आलेला उतार चढ़ावच आहे. तो आज आहे, उद्या जाईल आणि परवा पुनः कधीतरी नविन रूप घेईल. परन्तु याच काळात विद्याभ्यास, अध्यात्म, योग, कला तसेच आपले छंद सद्य परिस्थितीत सहनशक्ति देऊन , मानसिक आणि शारिरिक आरोग्य सक्षम, सुदृढ़, सशक्त आणि सकारात्मक करू शकतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona virus | कोरोनामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्था तोकडा

PM Jacinda Ardern | भारतामधून येण्याऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली