in

ओबीसी आरक्षणाशिवाय होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका

राज्यात आगामी निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी पाहायला मिळते. याच पार्श्‍वभूमीवर नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील पोटनिवडणूकओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. याआधी स्थगित केलेला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे राबविण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने रविवारी स्पष्ट केले.

पोटनिवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी रविवारी सांगितले.कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा निवडणूक आयोगाचाच आहे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने शनिवारी दिल्यानंतर आता या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भूपेंद्र पटेल आज घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Dadar, Mumbai