in ,

Zydus Cadila च्या विराफीन औषधाला भारतात परवानगी

देशात लसीकरण प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न सुरु असताना,आता आणखी एका औषधाला भारतात परवानगी देण्यात आली आहे.Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी डीसीजीआयने मान्यता दिली आहे.

या औषधाबाबत कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल 91.15 टक्के आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या कोरोनाबाधितांचे अहवाल हे 7 दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, डीसीजीआयने परवानगी दिल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लोक मरताहेत’; सुप्रीम कोर्टाचे पुन्हा ताषेरे

संग्रहित छायाचित्र

रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक… संगमनेरमध्ये दोघे अटकेत